Mahapolice | पोलीस भरती 2023-24 मराठी व्याकरणामध्ये कोण-कोणत्या घटकाची तयारी करावी ? Mahapolice

Mahapolice पोलीस भरती 2023-24 ची प्रक्रिया चालू झाली आहे. यासाठीची तयारी करत असताना आपल्याला या परीक्षेची व प्रक्रियेची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.

पोलीस शिपाई / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागह शिपाई या पदांसाठीची भरती ही दोन टप्प्यांमध्ये विभागली आहे एक फिजिकल किंवा शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. तर पोलीस शिपाई चालक पदासाठी यामध्ये आणखी एक टप्पा कौशल्‍य चाचणीचा असतो.

शारीरिक चाचणी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या आपल्‍या शारीरिक क्षमता तपासून पाहणार्‍या विविध स्‍वरूपाच्या चाचण्या द्याव्या लागतात. तर चालकांच्या कौशल्‍य चाचणीत वाहन चालविण्याचे कसब तपासण्यात येते.

पोलीस भरती लेखी परीक्षेचा देखील अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे. लेखी परीक्षा एकूण शंभर गुणांची असते. लेखी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला एकूण चार घटकांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये सामान्य अध्ययन, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी या घटकांचा समावेश आहे.

            या लेखात आपण मराठी विषयाचा अभ्‍यास किंवा तयारी कशाप्रकारे करावी, त्‍यामध्ये कोण-कोणते घटक अभ्‍यासावेत याचा विचार करणार आहोत. मराठी हा आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे तसेच ती आपली मातृभाषा असल्या कारणाने तसेच आपण सर्वजण शालेय स्तरापासून मराठी विषयाचा अभ्यास करत असल्याने पोलीस भरती लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमातील तुलनेने तयारी करायला सोपा असणारा घटक म्हणजेच, मराठी भाषा तथा व्याकरण हा आहे. यामध्ये आपल्याला कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास करावयाचा आहे, कोण-कोणत्या घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात या सर्वांची माहिती आज आपण पाहणार आहोत ….

मराठी भाषा व व्याकरण अंतर्भूत घटक

अंतर्भूत घटक https://youtu.be/2IZspyF340E?si=4FdEsM9rRI4sFDAS

  1. मराठी वर्णमाला : मराठी भाषेत एकूण वर्णांची संख्या किती, स्वर व व्यंजने यांची व्याख्या, संख्या, त्यांचे प्रकार इत्‍यादी उपघटक या घटकांमध्ये येतात.  या घटकावरील व्हिडिओ Vinayak Ghayal STUDY या यूट्यूब चॅनेल वर उपलब्ध आहे. या घटकाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.

मराठी वर्णमाला : https://youtu.be/yQ8aYs4opHQ?si=O_RiSB-gel73rOk2

नमुना प्रश्न : पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत ?

(१) क (२) फ (३) ग (4) ण

(A) फक्त 1 व 2 (B) फक्त 3 व 4

(C) वरीलपैकी सर्व (D) वरीलपैकी एकही नाही.

2. संधी विचार : मराठी भाषेत असणाऱ्या संधी, संधीचे प्रकार व संधीची उदाहरणे या घटकांवर या उपघटकांतर्गत प्रश्न विचारले जातात .

नमुना प्रश्न : चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारी स्वर व संधी बनेलला वर्ण ओळखा.

(अ) आ+उ = ओ (ब) द्र+ओ = द्रो (क) अ+उ = ओ (ड) र+ओ = रो

नमुना प्रश्न : खालीलपैकी कोणते उदाहरण हे व्यंजन संधीचे आहे?

1)  महर्षी 2) सूर्यास्त 3)विपतकाल 4)चतुसूत्री

3. शब्द विचार :  या घटकामध्ये शब्दांच्या जाती, त्यांचे प्रकार व उपप्रकार आणि त्यांचा वापर, जसे की-  एकूण आठ जाती  नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय या आहेत. या जातींचे उपप्रकार, त्यांचा वापर, त्यांच्या व्याख्या यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्‍याचबरोबर विकारी व अविकारी जाती कोणत्या? विकारी व अविकारी जाती म्हणजे काय? यावर देखील प्रश्न विचारले जातात

शब्दांच्या जाती : https://youtu.be/zy6tVbzpnMI?si=I7EbzP_XfIJlG0Rf

MCQs | नामाचे प्रकार | वस्तुनिष्ठ प्रश्न |https://youtu.be/iWc0HMRkVec?si=p_kWTTR984xS14K9

नमुना प्रश्न : दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणार्‍या शब्दांना …. म्हणतात.

(अ) शब्दयोगी अव्यय (ब) उभयान्वयी अव्यय

(क) केवलप्रयोगी अव्यय (ड) कि‘याविशेषण अव्यय

4. लिंग विचार :  लिंग विचार म्हणजे काय?  त्याचे प्रकार, लिंग परिवर्तन, लिंग रूपांतरण, लिंग ओळखणे या प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न : पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

(अ) काया (ब) पागोटे

(क) इमारत (ड) रुमाल

5. वचन विचार : वचन म्‍हणजे काय ? त्‍यावरून कशाचा बोध होतो ? वचनाचे प्रकार, एकवचन, अनेकवचन, वचन बदलणे, वचन ओळखणे इत्यादी स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात.

नमुना प्रश्न : निश्‍चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा.

(अ) गवई (ब) पपई

(क) सोई (ड) भोई

6. विभक्ती :  विभक्ती म्हणजे काय? विभक्‍तीचे प्रकार, विभक्तीचे प्रत्यय, कारकार्थ व त्यांचा वाक्यात उपयोग. सर्वसाधारणपणे विभक्ती प्रत्यय यावर या घटकांतर्गत भर दिला जातो.

नमुना प्रश्न : पुढील वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत. ही वस्तू मी इंग्लंडहून आणली.

(अ) पंचमी एकवचन (ब) षष्ठी एकवचन

(क) संबोधन (ड) चतुर्थी एकवचन

7. सामान्य रूप :  सामान्य रूप म्हणजे काय ? वेगवेगळ्या शब्दांचे सामान्य रूप कशाप्रकारे होते?

उदाहरणार्थ– कासव-कासवा, ससा- सशा इत्यादी

नमुना प्रश्न : विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणार्‍या बदलाला काय म्हणतात?

(अ) प्रत्यय (ब) सामान्य रूप (क) अव्यय (ड) शब्दसिद्धी

8. काळ –  काळाचे तीन प्रकार– वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ व त्या प्रकारांचे होणारे चार चार उपप्रकार. वाक्याचे एका काळातून दुसऱ्या काळात रूपांतर इत्यादी प्रश्न या घटकावर विचारले जातात.

नमुना प्रश्न : ‘ती नेहमी लवकर उठते’, या वाक्यातील काळ ओळखा.

(अ) साधा वर्तमानकाळ (ब) चालू वर्तमानकाळ

(क) पूर्ण वर्तमानकाळ (ड) रीती वर्तमानकाळ

8. प्रयोग :  प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे तीन प्रकार- कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग; त्यांचे उपप्रकार नवीन कर्मणी प्रयोग, प्रयोग ओळखणे या घटकावर विचारले जातात.

नमुना प्रश्न :

9. वाक्य विचार –  वाक्यांचे प्रकार– केवल, मिश्र व संयुक्‍त वाक्‍ये; वाक्याचे अर्थ न बदलता रूपांतर करणे, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, म्हणजे काय?  त्यांचे परस्पर रूपांतर, वाक्यांचे इतर प्रकार-  होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यर्थी वाक्य इत्‍यादी.

नमुना प्रश्न : ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली’ वाक्याचा प्रकार ओळखा.

(अ) मिश्र वाक्य (ब) केवल वाक्य

(क) संयुक्त वाक्य (ड) यांपैकी नाही.

10. समास :  समास म्‍हणजे काय ? समासाचे प्रकार व उपप्रकार आणि उदाहरणे

साधारणपणे समास या घटकावर एखादा शब्द दिला जातो व त्याचा प्रकार ओळखा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. किंवा समास सोडवा असेही विचारले जाते.

नमुना प्रश्न : ‘क्षणोक्षणी’ या सामासिक शब्दाचा विग‘ह लिहा.

(अ) क्षणभर (ब) क्षणिक

(क) क्षण+क्षण (ड) प्रत्येक क्षणाला

11. शब्दसिद्धी :  शब्दसिद्धी म्‍हणजे काय ? शब्दांचे प्रकार-  तत्सम, तत्भव, देशी, परदेशी ..विविध परकीय भाषांमधून मराठीत आलेले शब्द ओळखणे. शब्दांचा प्रकार ओळखणे

नमुना प्रश्न : परभाषीय शब्दाचे किती उपप्रकार आहेत?

(अ) तीन (ब) चार (क) दोन (ड) पाच

12. वृत्ते अलंकार : वृत्तांचे प्रकार, त्यांचे गण, लघु गुरु खुणा, मात्रा वृत्तांच्या मात्रा व त्यांचे प्रकार तसेच अलंकाराचे विविध प्रकार, त्यांची लक्षणे व उदाहरणे, इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न अलंकार : पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. ‘मरणात खरोखर जग जगते’

(अ) अर्थान्तरन्यास (ब) विरोधाभास (क) व्याजोक्ती (ड) सार

नमुना प्रश्न वृत्ते:

13. विरामचिन्हे :  वाक्यात येणारी व वापरली जाणारी विविध विरामचिन्हे, त्‍यांचा अचूक वापर, कोणते विरामचिन्ह कोठे वापरावे ? दिलेल्‍या वाक्‍यापैंकी विरामचिन्हांचा अचूक वापर असणारे वाक्‍य कोणते ? इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न : एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते?

(अ) प्रश्‍नचिन्ह (ब) स्वल्पविराम (क) पूर्णविराम (ड) अवतरणचिन्ह

शब्‍दसंग्रहावरील प्रश्न

वरील सर्व घटक हे व्याकरणांतर्गत येतात म्हणून त्‍यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. याव्यतिरिक्त मराठी भाषा या घटकांतर्गत शब्‍दसंग्रहावर देखील आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात ते घटक पुढीलप्रमाणे आहेत.

शब्दसमूह :  यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एकाच अर्थाचे भिन्न शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, शुद्ध शब्द ,अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, पारिभाषिक शब्द यावर प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न : खालीलपैकी ‘अष्टपैलू’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे?

(अ) आठवा पैलवान (ब) आठवडा

(क) आठ कोन असलेला (ड) सर्वगुणसंपन्न

नमुना प्रश्न : ‘तीक्ष्ण’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? https://youtu.be/-w3g4fQs5uo?si=HvtA7Zgg0qRVBduG

(अ) टोकदार (ब) बोथट

(क) मौन (ड) टणक

नमुना प्रश्न : खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.

(अ) आशिर्वाद (ब) आर्शीवाद (क) आर्शिवाद (ड) आशीर्वाद

वाक्प्रचार व म्हणी :  आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे मराठी भाषेतील वाक्प्रचार, म्हणी, त्यांचा वाक्यात उपयोग, समान अर्थाचे वाक्प्रचार, म्हणी ओळखा या स्‍वरूपाचे प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न : ‘खडा टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

(अ) मीठाचा खडा टाकणे. (ब) खडा मारणे.

(क) खडा शोधणे. (ड) अंदाज घेणे.

मराठीविषयक सामाज्ञ ज्ञान    

या सर्व घटकांबरोबरच बदलत्या परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धतीचा विचार करता मराठी साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती, साहित्यिकांची टोपण नावे, विविध सरकारी व बिगर-सरकारी साहित्‍यविषयक पुरस्‍कार, त्‍यांचे मानकरी, त्‍यांचे स्‍वरूप या घटकांवरही वाढत्‍या संख्येने प्रश्न विचारण्यात येत आहेत.

नमुना प्रश्न : ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने …. या कवीने कविता लिहिल्या.

(अ) गो. नी. दांडेकर (ब) वि. वा. शिरवाडकर

(क) राम गणेश गडकरी (ड) आ. रा. देशपांडे

महत्‍वाची संदर्भ पुस्‍तके

  1. संपूर्ण मराठी व्याकरण– के’सागर सर
  2. सुगम मराठी व्याकरण– मो. रा   वाळिंबे
  3. मराठी व्याकरण व शब्दसंग्रह– विनायक घायाळ व विद्या देशपांडे इत्‍यादी पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत .
mahapolice
mahapolice

मराठी व्याकरण | 25 वस्तुनिष्ठ प्रश्न | Police Bharti 2022 । २५ Marathi MCQ

https://youtu.be/FlrAXxAixMk?si=gz_-lr50AlhC3443

https://youtu.be/bMybZTHj8AQ?si=IU5445J_asorxbvU

तसेच पोलीस भरती परीक्षेसाठी मराठी व्याकरण व इतर घटकावरील अनेक व्हिडिओ Vinayak Ghayal STUDY या यु टयुब चॅनेलवर आपणांस पहावयास मिळतील.

Sharing Is Caring:

VINAYAK GHAYAL M.Sc. Chemistry {Gold medalist}; As an Author untill now He has written and Published 43+  books with K'Sagar Publications,

Leave a Comment

error: Content is protected !!